Brahma Valley Group of Institutions Recruitment 2026 : नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या संस्था अंतर्गत नाशिक येथे विविध पदांसाठी नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांसाठी आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीमध्ये विविध विभाग आहेत त्या विभागांतर्गत (Teaching) आणि शिक्षकेतर (Non-Teaching) अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या या भरती प्रक्रियेद्वारे कॅम्पस डायरेक्टर, प्राचार्य, विविध विषयांचे सहाय्यक प्राध्यापक, संचालक, ग्रंथपाल, लेखापाल आणि शिपाई या पदांवर उच्चशिक्षित व अनुभवी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर घडविण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सर्वोत्तम संधी आहे. या पद्धतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्र आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये तुम्हाला मिळून जाईल.
- महत्त्वाच्या तारखा
- जाहिरात प्रकाशित दिनांक: १ ऑगस्ट २०२६ (Nashik Main, Page No. 11)
- अर्ज करण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत (सुमारे ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत) अर्ज करणे आवश्यक आहे
Brahma Valley Group of Institutions Recruitment 2026 : पदांचे स्वरूप
| पदाचे नाव | पदे (जागा) |
| डायरेक्टर (Campus Director) | 1 |
| प्राचार्य (Principal) | 1 |
| संचालक – शैक्षणिक (Director Academic) | 1 |
| सहाय्यक प्राध्यापक (Asst. Professor – मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल) | 18 |
| सहाय्यक प्राध्यापक (Asst. Professor) | 8 |
| ग्रंथपाल (Librarian) | 2 |
| संचालक (Director) | 1 |
| लेखापाल (Accountant) | 2 |
| कॉलेज ऑफ एज्युकेशन (B.Ed.) प्राचार्य (Principal) | 1 |
| सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) | 8 |
| शिपाई (Peon) | 5 |
| एकूण पदे | 48 |
Brahma Valley Group of Institutions Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता Educational Qualification
ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन भरती 2026 भरती अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट
- कॅम्पस डायरेक्टर (Campus Director) या पदासाठी निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकारी किंवा निवृत्त प्राचार्य किंवा निवृत्त बँकिंग अधिकारी सोबतच पीएचडी असणे आवश्यक आहे.
- प्राचार्य (Principal) पदासाठी एम.ई. + पीएचडी + १५ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.
- संचालक – शैक्षणिक (Director Academic) या पदासाठी उमेदवारांची पीएचडी सोबतच निवृत्ती प्राचार्य किंवा बँकिंग अधिकारी असणे गरजेचे आहे.
- सहाय्यक प्राध्यापक (Asst. Professor) या पदासाठी उमेदवारांकडे एम.ई. + ३ वर्षे अनुभव (मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल विभाग) असणे गरजेचे आहे.
- इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (MBA)
- संचालक (Director) या पदासाठी उमेदवाराची एमबीए सोबतच पीएचडी आणि 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- सहाय्यक प्राध्यापक (Asst. Professor) या पदासाठी उमेदवारांकडे एमबीए पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- ग्रंथपाल (Librarian) या पदासाठी नेट / सेटसह एम.लिब (M.Lib) पूर्ण असणे अनिवार्य आहे.
- लेखापाल (Accountant) या पदासाठी उमेदवारांकडे एम.कॉम + टॅली प्राईम + ३ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.
- कॉलेज ऑफ एज्युकेशन (B.Ed.)
- प्राचार्य (Principal) या पदासाठी उमेदवाराचे नेट/सेट आणि पीएचडीसह एम.एड. झालेले असणे अनिवार्य आहे.
- सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदासाठी नीट किंवा सेट सोबतच एमडी पूर्ण असणे आवश्यक असते.
- शिपाई पदासाठी फक्त 10 वी पास असणे गरजेचे आहे.
Brahma Valley Group of Institutions Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Document
ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रांची यादी असणे महत्त्वाचे आहे.
- शैक्षणिक पार्श्वभूमी, वैयक्तिक माहिती आणि अनुभवाची माहिती स्पष्टपणे दिसत आहे.
- १० वी, १२ वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी चे गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे असणे बंधनकारक आहे.
- ग्रंथपाल आणि प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेला नेट किंवा सेट परीक्षेचे उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र.
- काही पदांसाठी अनुभव असणे गरजेचे आहे तर त्या पदासाठी अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
- ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही शासकीय अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणतेही एक असेल तरीही पुरेसे आहे.

अर्ज प्रक्रिया – How to Apply
ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन भरती 2026 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन नसून प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करायचा आहे. याची माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
- सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जाहिरात मधील दिलेल्या पत्त्यावर किंवा ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे.
- जाहिरात पाहता अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते सात दिवसाच्या आत अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख 1 ऑगस्ट 2026
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : ११, कृष्णा विहार अपार्टमेंट, एचडीएफसी हाऊसच्या मागे, शरणपूर-त्र्यंबक लिंक रोड, नाशिक-४२२००५
- जर तुम्हाला अर्ज पत्त्यावर पाठवून झाले नसेल तर तुम्ही अर्ज ई-मेल द्वारे पाठवू शकता : brahmavalleyho2000@gmail.com
| Notification PDF | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |

निवड प्रक्रिया
- अर्जदारांनी एआयसीटीई (AICTE) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार ठरवलेल्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्ण असेल तरच तुम्ही पात्र ठरू शकता.
- जर तुम्ही अर्ज तारखेच्या आत सादर केला असेल तर तुमच्या अर्जाची छाननी संस्थेकडून करण्यात येईल.
- पात्र झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. तुम्ही पात्र ठरलात की नाही याची सूचना मला तुमच्या ईमेल द्वारे किंवा मोबाईल द्वारे कळवली जाते.
- मुलाखतीमधील कामगारी आणि पात्रतेच्या आधारावर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येते ज्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतन देण्यात येते.
महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.
तुम्ही येथे “पंजाब नॅशनल बँक भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/punjab-national-bank-recruitment/