Central Government Recruitment 2026 :- मित्रांनो, केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ऋण वसुली अपील न्यायाधिकरण (DRAT), मुंबई आणि त्यांच्या अधिकार क्षेत्रातील न्यायाधिकरणांमध्ये (DRTs) विविध गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांसाठी प्रतिनियुक्ती (Deputation) तत्त्वावर भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सरकारी क्षेत्रात किंवा न्यायालयात काम करणाऱ्या आणि मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या शहरात नोकरी शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत खाली दिली आहे. ऋण वसुली अपील न्यायाधिकरण (DRAT) हे एक अर्ध-न्यायालयीन (Quasi-Judicial) प्राधिकरण आहे, जिथे बँकिंग आणि वित्तीय संस्थांच्या कर्ज वसुलीशी संबंधित मोठ्या प्रकरणांवर सुनावणी चालते.
महत्त्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जून २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत).
पदांचे नाव आणि एकूण जागा (Post Details)
या भरतीद्वारे एकूण ९० जागा भरण्यात येणार आहेत. जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- सेक्शन ऑफिसर (Section Officer – Group B): ०३ जागा (मुंबई).
- खाजगी सचिव (Private Secretary – Group B): ०७ जागा (मुंबई, अहमदाबाद, नागपूर, औरंगाबाद).
- सहाय्यक (Assistant – Group B): ३० जागा (मुंबई, अहमदाबाद, नागपूर, पुणे, औरंगाबाद).
- लेखा सहाय्यक (Accounts Assistant – Group B): ०८ जागा (मुंबई, अहमदाबाद, नागपूर, पुणे, औरंगाबाद).
- स्टेनोग्राफर ग्रेड-१ (Stenographer Grade-I – Group B): १७ जागा (मुंबई, अहमदाबाद, नागपूर, पुणे, औरंगाबाद).
- अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC – Group C): ०७ जागा (मुंबई, अहमदाबाद, नागपूर, पुणे, औरंगाबाद).
पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility & Age Limit)
- केंद्र सरकार / राज्य सरकार / न्यायालये / न्यायाधिकरण यांमधील पात्र नियमित अधिकारी आणि कर्मचारी या पदांसाठी अर्ज करू शकतात. संबंधित संवर्गात ५ ते १० वर्षांचा नियमित सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे (पदांनुसार पात्रता जाहिरातीत सविस्तर पहा).
वयोमर्यादा : अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
कंत्राट/प्रतिनियुक्ती कालावधी
- निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला ०१ वर्षासाठी केली जाईल, जी जास्तीत जास्त ०३ वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
- 📝 अर्ज कसा करावा? (How to Apply)
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील (Proforma) अर्ज व्यवस्थित भरावा.
- अर्जासोबत मागील ५ वर्षांचे (३१.०३.२०२६ पर्यंतचे) प्रमाणित APARs आणि दक्षता प्रमाणपत्र (Vigilance Clearance) जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज आपल्या मूळ विभागामार्फत (Proper Channel) खालील पत्त्यावर पाठवावा:
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव (Eligibility Criteria)
- ही भरती सरळसेवा नसल्यामुळे यासाठी सर्वसामान्य फ्रेश उमेदवार अर्ज करू शकत नाहीत. केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध न्यायालये किंवा इतर न्यायाधिकरणांमध्ये आधीच नियमित सेवा बजावत असलेले कर्मचारीच यासाठी पात्र आहेत. प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी सविस्तर पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- सेक्शन ऑफिसर (Section Officer): अर्जदार मूळ विभागात समकक्ष पदावर (Analogous Post) नियमित कार्यरत असावा.
- किंवा पे-मॅट्रिक्स लेव्हल-६ (रु. ३५,४०० – १,१२,४००) मध्ये किमान ०५ वर्षांची नियमित सेवा पूर्ण झालेली असावी.
- अतिरिक्त पसंती: ज्या उमेदवारांना कायदेशीर (Legal) किंवा न्यायालयीन (Judicial) कामाचा पूर्वअनुभव आहे, त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.
- खाजगी सचिव (Private Secretary): मूळ विभागात समकक्ष पदावर नियमित कार्यरत असणारे अधिकारी.
- किंवा स्टेनोग्राफर ग्रेड-१ (पे-मॅट्रिक्स लेव्हल-६) या पदावर किमान ०५ वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेली असावी.
- अतिरिक्त पसंती: कायदेशीर किंवा न्यायालयीन कामकाजाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य.
- सहाय्यक (Assistant) : मूळ संवर्गात किंवा विभागात समकक्ष पदावर नियमित सेवा बजावणारे कर्मचारी.
- किंवा पे-मॅट्रिक्स लेव्हल-४ (रु. २५,५०० – ८१,१००) मध्ये काम करण्याचा किमान १० वर्षांचा नियमित अनुभव असावा.
- लेखा सहाय्यक (Accounts Assistant): केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी जे समकक्ष पदावर कार्यरत आहेत.
- किंवा पे-मॅट्रिक्स लेव्हल-४ मध्ये किमान १० वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेली असावी.
महत्त्वाची अट:* उमेदवाराने ‘इन्स्टिट्यूट ऑफ सॅक्रेतारीएट ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट’ (ISTM) किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कॅश आणि अकाउंट्सचे (Cash & Accounts Work) प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
नियुक्तीचा कालावधी: निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला ०१ वर्षाच्या कालावधीसाठी केली जाईल. त्यानंतर उमेदवाराचे काम आणि विभागाची गरज लक्षात घेऊन हा कालावधी जास्तीत जास्त ०३ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. रिक्रूटमेंट रूल्स २०१८ नुसार ३ वर्षांपेक्षा जास्त मुदतवाढ दिली जाणार नाही.

अर्ज कसा करावा? (Step-by-Step Application Process) Central Government Recruitment
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑफलाईन आहे आणि ती प्रशासकीय मार्गाने (Through Proper Channel) करावी लागते. खालील पायऱ्यांचे तंतोतंत पालन करा:
- पायरी १: सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळावरून (drt.gov.in) किंवा प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधून अर्जाचा विहित नमुना (Proforma Annexure-I & II) डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या.
- पायरी २: अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, जसे की तुमचे नाव, जन्मतारीख, सध्याचे पद, शैक्षणिक पात्रता, आणि सेवेचा सविस्तर अनुभव अचूक आणि ब्लॉक अक्षरांमध्ये (Block Letters) भरा.
- पायरी ३: तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात आणि तुम्हाला ज्या शहरात नोकरी हवी आहे (Place of Posting), त्याचा स्पष्ट उल्लेख अर्जावर करा.
- पायरी ४: अर्जासोबत तुमच्या मागील ५ वर्षांचे (म्हणजेच ३१ मार्च २०२६ पर्यंतचे) गोपनीय अहवाल (APARs/ACRs) प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
- पायरी ५: तुमच्या मूळ विभागाच्या आस्थापना प्रमुखांकडून दक्षता प्रमाणपत्र (Vigilance Clearance Certificate) आणि सचोटी प्रमाणपत्र (Integrity Certificate) अर्जासोबत जोडून घ्या.
- या भरतीची अपडेट पाहण्यासाठी समोरील वेबसाईटला भेट द्या : https://drt.gov.in
- पायरी ६: हा संपूर्ण अर्जाचा संच सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या कार्यालयामार्फत खालील पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवा:
अर्ज पाठवण्याचा अधिकृत पत्ता:
द रजिस्ट्रार (The Registrar),
ऋण वसुली अपील न्यायाधिकरण (DRAT),
१ ला मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट,
कुलाबा, मुंबई – ४००००५.
तुम्ही येथे “सोलापूर महानगरपालिका भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता :