Malegaon Mahanagarpalika Bharti 2026 : मालेगाव शहरांमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची सुवर्णसंधी! आरोग्य क्षेत्रांमधील नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवण्यास उत्सुक असलेल्या पात्र उमेदवारांसाठी मालेगाव महानगरपालिका येथे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महापालिकेच्या क्षेत्रामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या एन.एन.वाडीया हॉस्पिटलचे कामकाज लवकरात लवकर सुरू व्हावे आणि आरोग्य सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी यासाठी अल्पमुदतीच्या ठोक मानधन तत्वावर डायरेक्ट मुलाखतीत द्वारे मालेगाव महानगरपालिका यातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये वैद्यकीय तज्ज्ञ, एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तसेच विविध वर्ग व श्रेणींमधील एकूण 18 प्रकारच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. फक्त सहा महिन्यांच्या विशिष्ट कालावधीसाठी असणाऱ्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या पण अत्यंत महत्त्वाच्या रोजगाराच्या संधीमुळे वैद्यकीय व निमवैद्यकीय चित्रांमधील तरुण तरुणींसाठी ही भरती प्रक्रिया महत्त्वाची संधी आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- मुलाखतीची तारीख: २५/०८/२०२६
- वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत
- मुलाखतीचे ठिकाण: मनपा मुख्यालय, किल्ला समोर, मालेगाव
Malegaon Mahanagarpalika Bharti 2026 : पदाची नावे आणि जागा
- वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (MD Medicine) ०१
२. बधिरीकरण तज्ज्ञ (Anesthesia) ०२
३. बालरोग तज्ज्ञ (MD Pediatrics) ०२
४. विकृतीशास्त्र तज्ज्ञ (Pathology) ०१
५. स्त्रीरोग तज्ज्ञ (OBGY) ०२
६. वैद्यकीय अधिकारी (MBBS) ०१
७. वैद्यकीय अधिकारी (BAMS) ०३
८. सिस्टर इंचार्ज / नाइट सुपरवायजर ०२
९. सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) ०१
१०. प्रयोगशाला तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ ०२
११. क्ष-किरण तंत्रज्ञ ०२
१२. स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ ०१
१३. मिश्रक (Pharmacist) ०२
१४. ऑव्झलरी नर्स मिडवाईफ (ANM) ०१
१५. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक ०२
१६. कक्ष सेवक ०६
१७. कक्षसेविका (महिला) ०६
१८. ड्रेसर ०२
Malegaon Mahanagarpalika Bharti 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
मालेगाव महानगरपालिका आरोग्य सेवा भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (MD Medicine)
- या पदासाठी मान्यताप्राप्त कोणतेही विद्यापीठांमधून एम.डी. (मेडिसिन) किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयामध्ये संबंधित विषयांमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक ठरते.
- बधिरीकरण तज्ज्ञ (Anesthesia)
- या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून एम.डी. (अॅनास्थेशिया) किंवा एम.बी.एस., डि.ए. (डप्लोमा इन अॅनास्थेशिया) किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- बालरोग तज्ज्ञ (MD Pediatrics)
- मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून उमेदवारांकडे एम.डी.डी.सी.एच / एम.डी. (बालरोग चिकित्साशास्त्र) किंवा समकक्ष या विषयांमधील पदवी असणे आवश्यक आहे.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- विकृतीशास्त्र तज्ज्ञ (Pathology)
- मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून उमेदवारांकडे एम.डी.डी.सी.एच / एम.डी. (बालरोग चिकित्साशास्त्र) किंवा समकक्ष या विषयांमधील पदवी असणे आवश्यक आहे.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- विकृतीशास्त्र तज्ज्ञ (Pathology)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी.डी.सी.एच / एम.डी. (शरीरशास्त्र) एम.बी.बी.एस. डी.सी.पी (डप्लोमा इन क्लिनिकल पथोलॉजी) किंवा समकक्ष पदवी.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- स्त्रीरोग तज्ज्ञ (OBGY)
- उमेदवाराकडे या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. (स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र) किंवा समकक्ष पदवी.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- वैद्यकीय अधिकारी (MBBS)
- या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून एम.बी.बी.एस. किंवा शासन मान्य समकक्ष पदवी असणे आवश्यक ठरते.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- वैद्यकीय अधिकारी (BAMS)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची BAMS (आयुर्वेद) किंवा शासन मान्य समकक्ष पदवी.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील तीन वर्षांचा अनुभव.
- महाराष्ट्र मेडिकल कौंसिल अधिनियमार्ंतगत नोंदणी आवश्यक.
- सिस्टर इंचार्ज / नाइट सुपरवायजर
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची H.S.C विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल जनरल नर्सिंग व मिडवाईफ या विषयाची पदवीका.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील परिचारीका म्हणून किमान ७ वर्षांचा अनुभव आवश्यक.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
- सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची H.S.C विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल जनरल नर्सिंग व मिडवाईफ या विषयाची पदवीका.
- पब्लिक हेल्थ नर्सिंग या विषयाचा शासनमान्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
- असा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परिचारीका म्हणून ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
- प्रयोगशाला तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी.
- मान्यता प्राप्त संस्थेची डी.एम.एल.टी परीक्षा उत्तीर्ण.
- वैद्यकीय प्रयोगशाळेतील किमान ३ वर्षांचा अनुभव.
- क्ष-किरण तंत्रज्ञ
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र या विषयासह विज्ञान शाखेची पदवी.
- शासन मान्यताप्राप्त संस्थेतून क्ष-किरण तंत्रज्ञ या विषयाचे प्रशिक्षण पूर्ण.
- स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची १२ वी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल जनरल नर्सिंग व मिडवाईफ या विषयाची पदवीका.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील परिचारीका म्हणून किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
- मिश्रक (Pharmacist)
- उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण.
- औषध निर्माण शास्त्रातील पदवीका (डि. फार्म.).
- संबधित कामाचा ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
- ऑव्झलरी नर्स मिडवाईफ (ANM)
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण.
- शासन मान्यताप्राप्त संस्थेचा ए.एन.एम. अभ्यासक्रम पूर्ण व त्यानंतर कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
- शस्त्रक्रिया गृह सहाय्यक
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- कक्ष सेवक
- इयत्ता ७ वी उत्तीर्ण व मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- कक्षसेविका (महिला)
- इयत्ता ७ वी उत्तीर्ण व मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- ड्रेसर
- महाराष्ट्र राज्य मंडळाची (१० वी) परीक्षा उत्तीर्ण.
- शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- पत्रांच्या साक्षांकित प्रती.
वयोमर्यादा Age limit
| प्रवर्ग | वयोमर्यादा |
| सर्वसाधारण उमेदवार | १८ ते ३८ वर्ष |
| मागासवर्गीय उमेदवार | १८ ते ४३ वर्ष |
| वैद्यकीय सेवा देणारे पात्र उमेदवार | कमाल वयाची अट लागू नाही |
वेतनश्रेणी – Salary
१. वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (MD Medicine) ६०,०००/-
२. बधिरीकरण तज्ज्ञ (Anesthesia) ६०,०००/-
३. बालरोग तज्ज्ञ (MD Pediatrics) ६०,०००/-
४. विकृतीशास्त्र तज्ज्ञ (Pathology) ६०,०००/-
५. स्त्रीरोग तज्ज्ञ (OBGY) ८०,०००/-
६. वैद्यकीय अधिकारी (MBBS) ६०,०००/-
७. वैद्यकीय अधिकारी (BAMS) ३०,०००/-
८. सिस्टर इंचार्ज / नाइट सुपरवायजर २०,०००/-
९. सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) २०,०००/-
१०. प्रयोगशाला तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ १४,०००/-
११. क्ष-किरण तंत्रज्ञ १४,०००/-
१२. स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ २०,०००/-
१३. मिश्रक (Pharmacist) १४,०००/-
१४. ऑव्झलरी नर्स मिडवाईफ (ANM) १८,०००/-
१५. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक १३,०००/-
१६. कक्ष सेवक ११,०००/-
१७. कक्षसेविका (महिला) ११,०००/-
१८. ड्रेसर ११,०००/-
Malegaon Mahanagarpalika Bharti 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
मालेगाव महानगरपालिका आरोग्य सेवा भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी मुलाखतीसाठी जात असताना खालील कागदपत्रांची यादी त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.
- जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जिथे जन्माची तारीख दर्शवली जाते तशी कागदपत्र.
- उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुणांची टक्केवारी दर्शवणारी गुणपत्रिका.
- अनुभव दाखला शासकीय किंवा निमशासकीय विभागात कामाचा अनुभव असलेला.
- एस.एस.सी. गुणपत्रिका, एच.एस.सी. गुणपत्रिका, पदासाठी शैक्षणिक पात्रता असल्यास उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
- उच्च शैक्षणिक अर्हता असल्यास त्याची गुणपत्रिका, शासकीय आयटीआय (ITI) चे प्रमाण पत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती.
| Official website | येथे क्लिक करा |
| Online Apply | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
Malegaon Mahanagarpalika Bharti 2026 : मुलाखत – Interview
मालेगाव महानगरपालिका आरोग्य सेवा भरती 2026 मुलाखत बाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.
- मुलाखतीची तारीख: २५/०८/२०२६ .
- वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत
- मुलाखतीचे ठिकाण: मनपा मुख्यालय, किल्ला समोर, मालेगाव
- उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची जननी नंतर केवळ पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल, अपात्र उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.
- मुलाखतीसाठी येत असताना कुठल्याही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा इतर भत्ता देण्यात येत नाही.
- इच्छुक असलेले उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आवश्यक सर्व शैक्षणिक, अनुभवाचे व इतर प्रमाणपत्र साक्षांकित प्रतीसह वरील नमूद केलेल्या वेळ व ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- मालेगाव महानगरपालिका आरोग्य सेवा भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
मालेगाव महानगरपालिका आरोग्य सेवा भरती 2026 मध्ये एकूण 63 जागा आहेत. - या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी भरती केली जाणार आहे?
या भरतीमध्ये आरोग्य सेवा विभागाशी संबंधित विविध पदांचा समावेश असू शकतो. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी. - मालेगाव महानगरपालिका भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असते. संबंधित पदासाठी आवश्यक पदवी, डिप्लोमा किंवा इतर शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिरातीत दिलेली असते. - या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार आणि शासनाच्या नियमांनुसार ठरवली जाते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळू शकते. - मालेगाव महानगरपालिका आरोग्य सेवा भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. - या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क पद व प्रवर्गानुसार वेगवेगळे असू शकते. शुल्काची अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी. - मालेगाव महानगरपालिका आरोग्य सेवा भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड होऊ शकते. - या भरतीसाठी अनुभव आवश्यक आहे का?
काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक असू शकतो, तर काही पदांसाठी अनुभवाची अट नसू शकते. पदनिहाय जाहिरात तपासणे आवश्यक आहे. - अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा. - मालेगाव महानगरपालिका आरोग्य सेवा भरतीची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
भरतीची अधिकृत जाहिरात, पदांची माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रियेची माहिती मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येते.

तुम्ही येथे “महाराष्ट्र राज्य शुल्क विभाग भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/msed-recruitment-2026/