MahaHousing Recruitment 2026: मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (महाहौसिंग), मुंबई अंतर्गत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये अनुभवी तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी आणि काही पदांसाठी खाजगी क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती सोप्या आणि आपल्या गावरान भाषेत खाली दिली आहे, नीट समजून घ्या आणि वेळेत अर्ज सादर करा.
महत्त्वाच्या माहिती आणि अटी (Important Info)
- अर्ज करण्याची पद्धत: अर्ज विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरात पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित (Self-Attested) प्रतींसह दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
- निवड प्रक्रिया: प्राप्त अर्जांमधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- कंत्राटी कालावधी: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी प्रथमतः १ वर्ष (काम पाहून ३ वर्षांपर्यंत वाढ शक्य). खाजगी क्षेत्रातील उमेदवारांसाठी प्रथमतः ११ महिन्यांचा कालावधी राहील.
- वयाची अट: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे वय ६२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पदांचे नाव, पात्रता आणि अनुभव (Post Details)
या भरतीमध्ये एकूण १५ प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत:
- संचालक (तांत्रिक)
- शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनीअरिंग (B.E / B.Tech / M.E / M.Tech) पदवी. (M.E/M.Tech ला प्राधान्य).
- अनुभव: शासकीय/निमशासकीय कार्यालयातून मुख्य अभियंता किंवा अधीक्षक अभियंता म्हणून सेवानिवृत्त किंवा या पदावर किमान ७ वर्षांचा अनुभव. गृहनिर्माण क्षेत्रातील २० वर्षांचा अनुभव आणि Mivan तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक.
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
- शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनीअरिंग (B.E / B.Tech / M.E / M.Tech) पदवी.
- अनुभव: मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त किंवा उपअभियंता अथवा समकक्ष पदावरील किमान ७ वर्षांचा अनुभव. गृहनिर्माण क्षेत्रातील १५ वर्षांचा अनुभव आणि Mivan तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक.
- उपअभियंता (स्थापत्य)
- शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी.
- अनुभव: शासकीय/निमशासकीय किंवा सुप्रस्थापित खाजगी कंपनीतील १० वर्षांपेक्षा जास्त अनुभव. (Mivan तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष साईटवरील किमान ७ वर्षांचा अनुभव आवश्यक).
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- शैक्षणिक पात्रता: स्थापत्य शाखेतील पदविका (Diploma) किंवा पदवी (B.E / B.Tech – Civil).
- अनुभव: किमान ७ वर्षांचा कामाचा अनुभव. (Mivan तंत्रज्ञानाचा साईटवरील किमान ५ वर्षांचा अनुभव). AUTOCAD चे ज्ञान आवश्यक.
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- शैक्षणिक पात्रता: विद्युत शाखेतील पदविका (Diploma) किंवा पदवी (B.E / B.Tech – Electrical).
- अनुभव: शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील ७ वर्षांपेक्षा जास्त अनुभव (इलेक्ट्रिकल बिल्डिंग सेवेतील किमान ५ वर्षांचा अनुभव). AUTOCAD चे ज्ञान आवश्यक.
- सहाय्यक नगररचनाकार (Assistant Town Planner)
- शैक्षणिक पात्रता: शहरी नियोजन (Urban Planning) विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी (ITPI मान्यताप्राप्त).
- अनुभव: Assistant Town Planner म्हणून किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. सेवानिवृत्तांना प्राधान्य.
- वास्तुविशारद (Architect)
- शैक्षणिक पात्रता: वास्तुकला/वास्तुशास्त्र (B.Arch / M.Arch) पदवी आणि Council of Architecture चे सक्रिय सदस्य.
- अनुभव: शासकीय किंवा स्थानिक मंडळामध्ये वास्तुविशारद म्हणून किमान ७ वर्षांचा अनुभव. AUTOCAD, Revit, Sketch Up चे ज्ञान आवश्यक.
- आरेखक (Draftsman)
- शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा/पदवी किंवा ITI (आरेखन – Draftsman Civil/Mech) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.
- अनुभव: आर्किटेक्चरल + स्ट्रक्चरल रेखांकनामध्ये किमान ७ वर्षांचा अनुभव. AUTOCAD चे उत्तम ज्ञान आवश्यक.
- सहाय्यक / कनिष्ठ अधिकारी (प्रशासन/जमिन)
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी.
- अनुभव: मंत्रालयीन सेवेतील कक्ष अधिकारी म्हणून किमान ७ वर्षांचा अनुभव किंवा सुप्रस्थापित खाजगी कंपनीतील ७ वर्षांचा प्रशासकीय/जमीन कामाचा अनुभव.
- कनिष्ठ अधिकारी (जमीन) – नायब तहसीलदार
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी.
- अनुभव: राज्य शासनाच्या सेवेतून नायब तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त किंवा नायब तहसीलदार म्हणून किमान १२ वर्षांचा अनुभव आवश्यक. जमीन संपादन, मोजमापाचे ज्ञान आवश्यक.
- संचालक (लेखा व वित्त)
- शैक्षणिक पात्रता: वाणिज्य पदवी/पदव्युत्तर (B.Com / M.Com) किंवा CA Inter / ICWA Inter / MBA (Finance).
- अनुभव: वित्त व लेखा कार्यालयातील उपसंचालक पदावरून सेवानिवृत्त किंवा लेखा अधिकारी (गट-अ) पदाचा किमान १५ वर्षांचा अनुभव. GST, TDS, CAG ऑडिटचे ज्ञान आवश्यक.
- लेखाधिकारी
- शैक्षणिक पात्रता: वाणिज्य पदवी/पदव्युत्तर (B.Com / M.Com) किंवा CA Inter / ICWA Inter / MBA (Finance) असल्यास प्राधान्य.
- अनुभव: वित्त व लेखा कार्यालयातील सेवानिवृत्त लेखाधिकारी किंवा गट-अ पदाचा किमान १२ वर्षांचा अनुभव. Tally ERP/Tally Prime चे ज्ञान आवश्यक.
- सहाय्यक विपणन अधिकारी (Assistant Marketing Officer)
- शैक्षणिक पात्रता: MBA किंवा पदव्युत्तर पदवी (Marketing/Digital Marketing/Branding कोर्स असलेल्यांना प्राधान्य).
- अनुभव: मार्केटिंग क्षेत्रातील किमान ७ वर्षांचा अनुभव. PFMS आणि MIS बाबी हाताळण्याचा अनुभव आवश्यक.
- लिपिक टंकलेखक (Clerk cum Typist)
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
- टायपिंग पात्रता: मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. वेगाचे शासकीय प्रमाणपत्र आवश्यक. तसेच MS-CIT, Tally-ERP आणि संगणकीय ज्ञान आवश्यक.
- अनुभव: आस्थापना/जमीन/लेखा/तांत्रिक/विपणन विभागातील कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
- शिपाई (Peon)
- शैक्षणिक पात्रता: फक्त १० वी परीक्षा उत्तीर्ण.
- अनुभव: निमशासकीय किंवा खाजगी संस्थेत शिपाई म्हणून किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक (सेवानिवृत्तांना प्राधान्य).
अर्ज कोठे आणि कसा करायचा? (Where to Apply)
उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज स्वहस्ताक्षरात पूर्ण भरून, त्यावर आपला नवीन फोटो लावून आणि सर्व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडून खालील पत्त्यावर सादर करावा.
अर्जाचा पत्ता: मा. व्यवस्थापकीय संचालक तथा मु. का. अ., महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (महाहौसिंग), ३ रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई – ४०००२१.
सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
